
पंढरपूरला दरवर्षी वारी संपल्यानंतर असंख्य लहान बालके अनाथ होतात. आजारी, अपंग किंवा मुलंच्या संगोपनाचा भार उचलू न शकणारे आईबाप विठुमाऊलीच्या भरवशावर या मुलांना सोडून देतात. या मुलांची जबाबदारी मायेने उचलणार्या 'पालवी' या सेवाभावी संस्थेत आदेश बांदेकर गेले. असंख्य अनाथ आणि एड्सग्रस्त मुलांची माय झालेल्या मंगलताई शहा यांच्या या संस्थेत 'होम मिनिस्टर' चे खेळ खेळून महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजीने या बालदोस्तांच्या सहवासातून, त्यांच्या माध्यमातून विठूमाऊलीची ऊरीऊरी भेट घेतली.
एकावर्षी 'होम मिनिस्टर' च्या भागात रखुमाईला पैठणी नेसवली होती. अगदी तसाच आनंद आज या 'पालवी'च्या शीतल वहिनींना पैठणी मिळाली म्हणून झाल्याच आदेश बांडेकर यांनी सांगितलं. येत्या आठवड्यात पंढरीची ही वारी 'होम मिनिस्टर' मधून अनुभवता येणार आहे, सोमवार ते शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजता!
No comments:
Post a Comment